Ad will apear here
Next
‘अडचणींचे बुजगावणे करू नका’


पुणे :
‘प्रबळ इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि चिकित्सक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. खेड्यापाड्यांतील मुला-मुलींमध्ये उत्तम प्रतिभा, बुद्धिमत्ता आहे; पण मोठ्या यशात त्याचं रूपांतर करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यावर मात करण्याची इच्छाशक्ती हवी. सबबी सांगून चालणार नाही. अडचणींचे बुजगावणे करू नका,’ असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी, २१ जानेवारी रोजी तरुणांना दिला. 

पंच्याहत्तरीत पदार्पण केल्यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते डॉ. साळुंखे यांचा पुण्यात गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. साळुंखे बोलत होते. डॉ. आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सवी गौरव समिती आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. साळुंखे यांची ग्रंथतुलाही करण्यात आली. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

डॉ. साळुंखे यांनी तरुणांना उद्देशून सांगितले, ‘हजारो वर्षं तुम्हाला उपलब्ध नसलेल्या अनेक संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचा उपयोग करून घ्यायला हवा. ‘थंडी आणि उष्णतेला जे काडीइतंकही महत्त्व देत नाहीत, त्याचं सुख त्याला सोडून जात नाही,’ असे गौतम बुद्धांचे एक वचन आहे. यात थंडी आणि उष्णता हे शब्द अडीअडचणी, संकटे या अर्थाने वापरलेले आहेत. नवे घडवत असताना नकारात न गुंतता काही निर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. हिंसाचाराचा मार्ग अवलंबू नये.’

‘‘हा कोणाचा, हा कोणाचा’ असे म्हणू नये. ‘हा आमचा, हा आमचा’ असे म्हणावे,’ हे महात्मा बसवेश्वरांचे वचन मी नेहमी लक्षात ठेवतो. म्हणजे कोण कोणत्या जातीचा, धर्माचा हे महत्त्वाचे नाही. माणूस म्हणून समोरचा किती चांगला आहे हे महत्त्वाचे. चांगला माणूस होणे ही परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ता होण्याची पूर्वअट आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करायचे, तर विधायक, न्याय्य बुद्धीने आणि समतोल विचारानेच करायला हवे. भारतासारख्या संमिश्र समाजात आंतरिक ऐक्य राहिले नाही, तर देश एकरूप असणार नाही. म्हणून मतभेद, अनिष्ट चाली-रीती दूर करताना एकमेकांना समजून घेणे, संवाद ठेवणे, एकमेकांबद्दल आदर बाळगणे आवश्यक आहे.’

‘निळू फुले आणि नागनाथअण्णा नायकवडी या दोन व्यक्तींनी जे प्रोत्साहन मला दिले, त्याला तोड नाही. त्यांची आठवण होते आहे. भाई वैद्य, एन. डी. पाटील मला मार्गदर्शन करायला अजून आहेत. विश्वकोषात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्रावर शंभर लेख लिहिण्याची संधी मला देणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचीही तीव्रतेने आठवण होते आहे,’ असे डॉ. साळुंखे यांनी नमूद केले.

‘कोणतीही पार्श्वभूमी नसताना साहित्य, संस्कृती क्षेत्रात डॉ. साळुंखे यांनी दिलेले योगदान पाहून त्यांच्याबद्दल केवळ अभिमानच वाटतो असं नव्हे, तर त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याची भावना निर्माण होते,’ असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले.

(या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZRABK
Similar Posts
पाली भाषेतील पहिल्या भारतीय लघुपटाची निर्मिती पुणे : पाली भाषेतील पहिला भारतीय लघुपट नुकताच तयार झाला असून, तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. पाली भाषा दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाच्या पाली भाषा विभागात १७ सप्टेंबर रोजी त्याचे सादरीकरण करण्यात आले. ‘नक्खत्त जातकं’ असे त्या लघुपटाचे नाव आहे. लवकरच तो सर्वांसाठी प्रदर्शित केला जाणार आहे
‘वैराऐवजी स्नेहाचा, सलोख्याचा मार्ग पुढे नेईल’ पुणे : दोन समाज जोडले जाणारे उपक्रम म्हणून हे साहित्य संमेलन आहे. भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये हजार वर्षांचा संपर्क आहे. कटुता, युद्ध, संघर्ष, वादळेदेखील आहेत आणि स्नेह, मैत्री, जिव्हाळाही आहे. भूतकाळातून काय घ्यायचे, भावी पिढ्यांना काय वारसा द्यायचे, हे ठरवणे ही आपली
डॉ. आ. ह. साळुंखे करणार मुस्लिम साहित्य संमेलनाचे उद्घाटन पुणे : ‘मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन चार ते सहा जानेवारी २०१९ या कालावधीत दरम्यान पुणे येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे
सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकाचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language